गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येत असेल्या ” रन फॉर युनिटी” या उपक्रमांतर्गत मंठा पोलीस दलाच्या वतीने
एकता दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मंठा शहरातील तळणी-लोणार रोडवरून सकाळी सात वाजता या मार्गावरून पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड , नगराध्यक्ष व बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे , पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे विठ्ठल केंद्रे यांच्यासह नगरपंचायत लेखपाल दामोदर , स्वच्छता निरीक्षक पुणेकर यांच्यासह अंतरिक्ष व कमांडो अकॅडमीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करून मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी एक भारत एकता आणि अखंडतेसाठी धावूया या प्रेरणादायी घोषणा दिल्या. या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकता बंधुता आणि देशभक्तीचा संदेश समाजात पोहोचणे हा आहे , असे पोलीस निरीक्षक राठोड यांनी बोलताना सांगितले.
पोलीस कर्मचारी आनंद ढवळे, संतोष बनकर, रवि जाधव,सतिश आमटे , विलास कातकडे ,मारूती वाटुरे, आसाराम मदने,सज्जन काकडे, डांगरे ,कानबा हाराळ, बाळासाहेब पुणेकर, श्रीकांत काळे , शिवानंद काळुसे , रामेश्वर उपरे यांच्यासह अंतरिक्ष व कमांडो अकॅडमीतील मुले-मुली उपस्थित होत्या.
Users Today : 18