बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
पैसे दिले की अपात्र लाभार्थ्यांना घर न बांधता हप्ता टाकतात, पात्र लाभार्थ्यांना पैसे दिले नाही म्हणून बजेट नाही
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा पंचायत समितीमधील घरकुल अभियंता एस.बी. यडेकर यांच्यावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत
असून, पात्र लाभार्थ्यांना हक्काचे चेक थांबवून त्रास देत असल्याची संतप्त तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घरकुक अभियंता पात्र लाभार्थ्यांचे चेक “बजेट नाही” या कारणावरून रोखून धरतात, मात्र पैसे देणाऱ्यांचे चेक विना अडथळा पास केल्याचे उघड झाले आहे.
पंचायत समिती मंग
म्हणजेच, घेण्यात आलेल्या पैशांच्या बदल्यात अपात्रांना लाभदेणे आणि पात्रांना नाकारणे असा थेट भ्रष्टाचाराचा प्रकार या कार्यालयात सुरु असल्याचा आरोप आहे. काही अपात्र व्यक्तींना बांधकाम न करता सुमारे ७० हजार रुपयांचे चेक देण्यात आले असल्याचे धक्कादायक उदाहरण पुढे आले आहे. दुसरीकडे, प्रत्यक्ष
बांधकाम पूर्ण केलेल्या आणि अत्यंत गरजू लाभार्थ्यांचे चेक महिनो-महिने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.
करून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, संबंधित इंजिनिअरविरुद्ध सखोल चौकश कठोर कारवाईची मागण वसीम कुरेशी व शकील कुरेशी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. “पैशांशिवाय काम नाही’ भ्रष्ट मानसिकतेल लगाम लावणे आवश्यव असल्याची मागणी घर को घरकुल धारकाकडुण होत आहे.
