१५ नोव्हेंबरपासून अमरावती जिल्ह्यात शासकीय शेतमाल खरेदीला प्रारंभ

Khozmaster
2 Min Read

अमरावती प्रतिनिधी

दिवाळीपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा असलेली शासकीय शेतमाल खरेदी प्रक्रिया विलंबाने का होईना, अखेर १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या खरेदी प्रक्रियेसाठी १५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. खरेदीचा कालावधी १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांपर्यंत राहणार असून शेतकरी आपल्या नजीकच्या केंद्रावर कागदपत्रांसह नोंदणी करू शकतात.

मान्यताप्राप्त खरेदी केंद्रे

जिल्ह्यातील पणन महासंघाच्या ८ आणि विदर्भ को-ऑपरेटिव्हच्या ७ उपअभिकर्ता संस्थांना नोंदणी व खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

पणन महासंघ उपअभिकर्ता संस्था :
अचलपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ मर्यादित (अचलपूर), जवसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित (पथ्रोट), दर्यापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (दर्यापूर), धारणी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था (धारणी), नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था (नेरपिंगळाई), चांदूर रेल्वे विकास खंड सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती (चांदूर रेल्वे), नांदगाव खंडेश्वर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती (नांदगाव खंडेश्वर), आणि डॉ. बी. पी. देशमुख तिवसा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती (तिवसा).

विदर्भ को-ऑपरेटिव्ह उपअभिकर्ता संस्था :
अमरावती, अंजनगाव सुर्जी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (अंजनगाव सुर्जी), चांदूर बाजार तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (चांदूर बाजार), शिंगणापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था (दर्यापूर-शिंगणापूर), दत्तापूर (धामणगाव) अॅग्रीकल्चर खरेदी विक्री संघ (धामणगाव रेल्वे), मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ (मोर्शी), आणि वरुड तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ (वरुड).

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड व मोबाईल क्रमांक

चालू हंगामातील पीक पेरा नमूद असलेला सातबारा

नमुना ८-अ (असल्यास)

सामाईक सातबारा असल्यास सर्व भागधारकांची संमती पत्रे

अद्यावत बँक पासबुकची छायांकित प्रत

शेतकऱ्यांनी या कागदपत्रांसह नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी कळविले आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *