बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
या नियुक्तीबद्दल २६ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अॅड. काझी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी बोलताना दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, “ना. अजित पवार यांनी अॅड. नाझेर काझी यांना पक्ष संघटनेत प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी देऊन योग्य निर्णय घेतला आहे. ते निश्चितच अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या समस्या सोडवून या पदाला न्याय देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत आ. मनोज कायंदे यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे, पंजाबराव देशमुख, इरफान शेख अहमद, वसंतराव शिंदे, कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, सेवादल जिल्हाध्यक्ष देवेंद्र देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पाटील, पुंजाजी टीकार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा सरस्वती खासणे, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, विजय काटोले, सभापती गणेश ताठे, पवन पवार, आणि जयराम मुंडाले यांनीही अॅड. काझी यांचा सत्कार केला.
