नांदेडमध्ये शिवसेनेची भव्य बैठक — जनतेचा आवाज बनवण्याचा निर्धार

KHOZ MASTER
1 Min Read

नांदेड :- तालुका प्रर्तीनिधी 
नांदेड दौऱ्यानिमित्त स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर मतदारसंघाचे आमदार मा. बालाजी कल्याणकर, दक्षिण मतदारसंघाचे आमदार मा. आनंदराव पाटील बोंढारकर आणि हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना नांदेड जिल्ह्याची भव्य बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस जिल्हाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, विविध विभाग प्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणावर, स्थानिक पातळीवरील कार्यसंघ रचनेवर आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी सर्व मान्यवरांनी एकमुखाने ठरविले की —
“नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा विचार प्रत्येक गावागावात पोहोचवायचा आणि नांदेडला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवायचा.”

नांदेड जिल्हा म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना म्हणजे जनतेचा आवाज,” असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *