हिवरा आश्रम (प्रतिनिधी) ;-
मेहकर मतदारसंघातील मौजे हिवरा आश्रम येथे उमेश वाळुकर व विनायक धांडे यांच्या “श्रीकृष्ण भोजनालय” या नवीन उपक्रमाचा शुभारंभ दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी नूतन व्यवसाय प्रारंभाबद्दल उमेश वाळुकर आणि विनायक धांडे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच वाळुकर-धांडे परिवाराच्या वतीने केलेला सन्मान नम्रपणे स्वीकारत त्यांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सरपंच श्री. मनोहर गिऱ्हे, शिवसेना नेते श्री. दामू अण्णा गारोळे, युवासेना पदाधिकारी अमोल म्हस्के, सुमित भाकडे तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत “श्रीकृष्ण भोजनालय” हिवरा आश्रम परिसरातील खाद्यप्रेमींसाठी एक उत्तम सुविधा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
