बुलढाणा शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ — प्रभाग क्र. ०१ मध्ये भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा (प्रतिनिधी) :

बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील लघुवेतन सोसायटी, गौरक्षण वाडी व भीम नगर परिसरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आज माझ्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

माझ्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या या विकासकामांमुळे शहराच्या पूर्व भागातील रस्ते, नाल्या व नागरी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. या उपक्रमाचे स्वागत करत स्थानिक नागरिकांनी माझ्या लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक व्यक्त केले.

प्रभागातील प्रमुख विकासकामांमध्ये —

  • लघुवेतन गृहनिर्माण सोसायटीतील खुल्या भूखंडात पेव्हर ब्लॉक बसविणे — ₹४२.८८ लाख

  • गौरक्षण वाडी आठवडी बाजार मागील रस्त्यापासून अशोक काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता — ₹६.३९ लाख

  • गौरक्षण वाडीतील सतीश राऊत ते बबन लहाने यांच्या घरापर्यंत रस्ता — ₹५.४५ लाख

  • गौरक्षण वाडीतील शंकर जाधव ते टिनू हडळे यांच्या घरापर्यंत — ₹४.५० लाख

  • गौरक्षण वाडी आठवडी बाजार मागील रस्त्यापासून दीपक हिवाळे यांच्या घरापर्यंत — ₹१३.४९ लाख

  • गौरक्षण वाडीतील बबन लहाने ते गवारे यांच्या घरापर्यंत — ₹१२.०८ लाख

  • भीम नगरातील दादाराव गायकवाड ते रतन अंभोरे यांच्या घरापर्यंत — ₹२४.३९ लाख

  • भीम नगरातील खुल्या भूखंडापासून संजय हिवाळे यांच्या घरापर्यंत — ₹१५.३४ लाख

  • भीम नगरातील अमोल खडके ते लोखंडे यांच्या घरापर्यंत — ₹८.५५ लाख

  • भीम नगरातील रमाई पुण्याई घरापासून केसरी सागर खरात यांच्या घरापर्यंत — ₹१७.२७ लाख

  • भीम नगरातील प्रशांत खरात ते निकाळजे यांच्या घरापर्यंत — ₹४.८८ लाख

या सर्व कामांचा एकत्रित खर्च कोट्यवधी रुपयांत असून, या प्रकल्पांमुळे शहराच्या पूर्व भागात मूलभूत नागरी सोयीसुविधांचा दर्जा उंचावणार आहे.

या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शिवसेना मुख्य पक्ष निरीक्षक विजुभाऊ अंभोरे, महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड यांच्यासह आशिषबाबा खरात, उदय सुरडकर, आशिष जाधव, दादाराव गायकवाड, बाळू जाधव, गजेंद्र दांदडे, मनोज यादव, निलेश गायकवाड, किरण गायकवाड, बंडू आसाबे, श्रीकृष्णाभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याला शिवसेना व युवासेना पदाधिकारी, नागरिक, माता-भगिनी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी माझ्या लोकाभिमुख विकासदृष्टीचा व जनसंपर्कप्रधान नेतृत्वाचा गौरव केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *