प्रभाग क्र. ०५ मधील भव्य जनसंवाद बैठक उत्साहात पार पडली — नागरिकांच्या अपेक्षा, विकास आणि निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा (प्रतिनिधी) :
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ०५ मधील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली भव्य जनसंवाद बैठक दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. डी. सी. गुप्ता नगरपालिका शाळा, कारंजा चौक येथे माझ्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली.

आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकासकामे, प्रलंबित विषय, तसेच जनतेच्या अपेक्षा आणि अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिकांनी उपस्थित राहून प्रभागातील प्रश्न मांडले, तसेच माझ्या जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्क व लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक केले.

या प्रसंगी प्रभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माझा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.

बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये —
युवासेना कार्यकारिणी सदस्य व युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, ऍड. जितेंद्र कोठारी, राजेश देशलहरा, कमलेशजी कोठारी, घनशाम चोपडा, अमरचंद कोठारी, डॉ. दिनेश अग्रवाल, अतुल लाहोटी, रितेश अग्रवाल, अरुण भूतडा, पपुसेठ अग्रवाल, नंदू यादव, प्यारेलाल हडाले, शाम चितळे, जुनेद राज, अब्दुल रशीद, शिवा पाटील, नाना बगाडे, बंटीसेठ छाजेड, संजय बनसोडकर, श्रीराम उज्जेनकर, टिकमसेठ वाधवाणी, आर. व्ही. कुलकर्णी, राजूभाऊ मोहळे, अजय कायस्थ, नामदेव म्हस्के, गुड्डू येमले, रमेश धनवे, अशोक बजाज, सुधीर भालेराव, मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, मुख्य पक्ष निरीक्षक विजयजी अंभोरे, अनुजाताई सावळे, गजेंद्र दांदडे, आशिष जाधव, वैशालीताई ठाकरे, रामेश्वरीताई चव्हाण, दादाराव गायकवाड, मनोज यादव, पिंटू काटकर, बाळू जाधव, निलेश गायकवाड, रणजित गायकवाड, रवी भगत, विष्णू ढेमरे, अजय खोत यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना आणि अल्पसंख्यांक सेना या आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या भाषणादरम्यान मी स्पष्ट सांगितले की —

जनतेचा संवाद हीच आमची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रभागातील विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर लोकसेवेचे एक सशक्त कुटुंब आहे.

बैठकीचा समारोप जयघोषांच्या गजरात व उत्साही वातावरणात झाला.
शेवटी, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा प्रत्येक प्रभागात फडकवण्यासाठी सर्व नागरिक, माता-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले.

0 9 5 5 3 2
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *