कोथळी-तालखेड जिल्हा परिषद सर्कलचा भव्यदिव्य मेळावा जयघोषांच्या गजरात उत्साहात संपन्न!

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा (प्रतिनिधी):
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना तसेच विविध आघाड्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कोथळी (ता. मोताळा) येथील नागझरी मंदिर परिसरात कोथळी-तालखेड जिल्हा परिषद सर्कलचा भव्यदिव्य मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.

या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य व युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना मुख्य पक्ष निरीक्षक विजयजी अंभोरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड तसेच विविध सर्कलमधील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळावा सुरू होताच संपूर्ण परिसर “जय शिवराय!”, “धर्मवीर संजुभाऊ गायकवाड!” या घोषणांनी दुमदुमला आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी परिसरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी सांगितले की,

“जनतेच्या विश्वासावर चालणारे राजकारण हेच लोकसेवेचे खरे राजकारण आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करून
प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे आवाहन मी सर्वांना करीत आहे.”

मेळाव्याचे आयोजन उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
या यशस्वी आयोजनात कोथळी-तालखेड सर्कलमधील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांचा मोठा सहभाग होता.

मेळाव्याच्या शेवटी उत्साही वातावरणात अनेक नागरिकांनी माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
जयघोषांच्या गजरात, एकजुटीच्या भावनेने आणि शिवसेनेच्या विजयाच्या निर्धाराने हा भव्य मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

0 9 5 5 3 2
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *