बुलढाणा शहरात चारभुजा स्वीट्स व फूड केटरिंगतर्फे महाप्रसाद समारंभ व विशेष सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा (शहर प्रतिनिधी):
आज बुलढाणा शहरात चारभुजा स्वीट्स आणि फूड केटरिंगचे सर्वेसर्वा श्री. विमलेश महाराज यांच्या वतीने श्री चारभुजा नाथ जी महाराज यांच्या पवित्र सानिध्यात महाप्रसाद समारंभ आणि विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाले.

या मंगल सोहळ्यास केंद्रीय मंत्री मा. ना. श्री प्रतापरावजी जाधव साहेब उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सांवरिया सेठ आणि श्री चारभुजा नाथ जी महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन गोमातेचे पूजन करण्यात आले.


सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी

श्री. विमलेश महाराज यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या चारभुजा स्वीट्स आणि फूड केटरिंगच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी लग्न समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ आणि अन्य धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांसाठी उत्तम खाद्यपदार्थ व उत्कृष्ट केटरिंग सेवा दिली जाते.
त्यांच्या या दर्जेदार आणि समर्पित सेवेमुळे त्यांचा विशेष सत्कार व गौरव करण्यात आला.


मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला आमदार सौ. श्वेताताई महाले, विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, शहरातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर नागरिक आणि असंख्य भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी श्री. विमलेश महाराज यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम

सोहळ्यादरम्यान उपस्थितांनी व्यक्त केले की,

“चारभुजा नाथ महाराजांच्या आशीर्वादाने सेवा आणि संस्कार यांचा संगम घडविण्याचे कार्य विमलेश महाराज करत आहेत. बुलढाणा शहरात त्यांनी निर्माण केलेले सेवाभावी वातावरण हे प्रेरणादायी आहे.”

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *