चिखली (प्रतिनिधी):
राज्य आणि केंद्रात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ कार्यरत आहे. मात्र चिखली नगरपालिकेतही भाजप-महायुतीची सत्ता आणून या ‘ट्रिपल इंजिन सरकारला चौथे इंजिन’ जोडू, ज्यामुळे चिखलीच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असे आवाहन करत सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजप आणि श्री अंबिका अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम शनिवारी मौनी बाबा संस्थानच्या भव्य प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम केवळ स्नेहभेटीपुरता मर्यादित न राहता, आगामी चिखली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या संघटित तयारीचा संकल्प सोहळा ठरला.
चिखलीत भाजप महायुतीची सत्ता आणण्याचे लक्ष्य
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना आवाहन करताना सांगितले की,
“चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज व्हा. भाजपकडून ज्या उमेदवाराला संधी मिळेल, त्याला एकदिलाने विजयी करून दाखवायचे आहे. चिखलीचा विकास हेच आपले ध्येय असून, नगरपरिषदेतही महायुतीचा विजय निश्चित करायचा आहे.”
उत्साहात पार पडले स्नेहमिलन
या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. राजाभाऊ खरात यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. विद्याधरजी महाले (खाजगी सचिव, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), श्री. रामकृष्णदादा शेटे, श्री. सतीशजी गुप्त, श्री. प्रेमराजजी भाला, ॲड. विजयकुमारजी कोठारी, श्री. सुरेशअप्पाजी खबूतरे, पंडितदादा देशमुख, डा. प्रतापसिंगजी राजपूत, श्री. हरिकिशनजी वाधवाणी, ॲड. मंगेशजी व्यवहारे, श्री. देविदासजी जाधव, डा. नरवाडे, श्री. आनंदराव हिवाळे, श्री. सुरेंद्रप्रसादजी पांडे, श्री. अंकुशराव पाटील, श्री. रामदासभाऊ देव्हडे, भाई विजय गवई, श्री. सागर पुरोहित, श्री. कृष्णकुमार सपकाळ, श्री. रफिकभाई, श्री. अनिसभाई, श्री. विजय वाळेकर, श्री. गजाननजी वाधवाणी, हाजी हनिफभाई, श्री. सलिम परवेज, श्रीमती सुनंदाताई शिनगारे, सौ. सुनीताताई भालेराव, सौ. शकुंतलाताई बाहेकर, श्री. नीलेशजी अंजनकर, श्री. भगवानदासजी नागवाणी, श्री. शीतलजी गुरुदासानी, श्री. युवराजजी भुसारी, सौ. अर्चनाताई खबूतरे, सौ. मंगलाताई झगडे, सौ. नीताताई सोळंकी, सौ. छायाताई खरात, सौ. नीताताई जैन, श्री. नईमभाई सौदागर, श्री. शहजादभाई, सौ. विमलताई देव्हडे, श्री. सत्यनारायणजी लढ्ढा, श्री. अशोक अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
कार्यक्रमात दीपप्रज्वलन, स्नेहसंमेलन आणि सामाजिक ऐक्याचे संदेश यांचा सुंदर संगम दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Users Today : 34