बुलढाणा (प्रतिनिधी):
जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे संपन्न झालेल्या अमरावती विभागस्तरीय शालेय तलवारबाजी (Fencing) स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात आदर्श विद्यालयाचे रुद्र मगर व विराट जाधव यांनी गोल्ड मेडल, तर विघ्नेश गुळवे याने सिल्वर मेडल पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे तिघांचीही राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक शेषनारायण लोढे, तसेच नितीन जेऊघाले, क्रीडा अधिकारी श्री. सोळंकी, खेलो इंडिया सेंटरचे प्रशिक्षक अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर आणि दर्शन बोर्डे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शि.प्र.मं. अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य गव्हले, उपप्राचार्य आरसोडे, पर्यवेक्षक दंडे, शेटे, तायडे यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या तिघांच्या यशामुळे आदर्श विद्यालयाचे नाव पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात गौरवाने उजळले आहे.
Users Today : 34