आदर्श विद्यालयाचा राज्यस्तरीय झेंडा फडकला — तीन विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, प्रतिनिधी :-

जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

मुलांच्या १४ वर्षाखालील गटात आदर्श विद्यालयाच्या रुद्र मगर आणि विराट जाधव यांनी प्रत्येकी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले, तर विघ्नेश गुळवे याने रौप्यपदक (Silver Medal) मिळवून विद्यालयाचा मान वाढविला. या यशस्वी प्रदर्शनामुळे तिघांचीही निवड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शेषनारायण लोढे, नितीन जेऊघाले, क्रीडा अधिकारी सोळंकी, तसेच खेलो इंडिया सेंटरचे प्रशिक्षक अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर आणि दर्शन बोर्डे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुमित देशमुख, लांडकर, तसेच शैक्षणिक प्रसार मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य गव्हले, उपप्राचार्य आरसोडे, पर्यवेक्षक दंडे, शेटे, तायडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

या विजयानंतर विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यस्तरावरही हे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करून बुलढाणा जिल्ह्याचा झेंडा अधिक उंच फडकवतील, असा विश्वास सर्व शिक्षकवर्ग आणि पालकांनी व्यक्त केला आहे

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *