जिल्हा प्रतिनिधी ;-
बुलढाणा
जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरदापुर टोल नाक्या नजीक 22 ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी मेहकर पोलीस व बुलढाणा एलसीबीच्या पथकांने
6 आरोपीना अटक केली असून जवळपास अडीच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मेहकर कोर्टाने आरोपींची पोलीस कस्टडी दिली होती ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत आरोपींची रवानगी बुलढाणा येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती अशा आरोपीकडून उर्वरित सोने तसेच मुख्य सूत्रधार याचा शोध घेणे बाकी असल्याने मेहकर पोलिसांनी काल 31 ऑक्टोबर रोजी अटक केलेले विजयसिंग रामसिंग साखला, शिवसिंह
गमेरसिंह लालसिंह झाला, शैतानसिंह भैरवसिंह कितावत, रतनसिंह अमरसिंह सारंगदेव, शंकरसिंह जोधसिंह डुलावत, शंभूसिंह राठोड सर्व रा राजस्थान या 6 आरोपींना पुन्हा मेहकर कोर्ट समक्ष हजर करून आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे सध्या कोर्टाने आदेश दिला नसून येत्या दोन दिवसात आरोपींची पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता पोलिसांनी आज 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वर्तवली आहे
समृद्धी’ वरील सोने लुट प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा मागितली पोलीस कस्टडी
0
9
5
5
3
6
Users Today : 38
Leave a comment