ढगफुटी सदृश पावसामुळे धाड परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान — तात्काळ मदतीची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :- 

चिखली मतदारसंघातील धाड परिसरात १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे पिकांचे नुकसान, बांध तुटणे, शेतीतील माती वाहून जाणे तसेच जनावरांच्या चाऱ्याची हानी अशा विविध स्वरूपाचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, धाड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने खरीप हंगामातील पिकांची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने या भागात तातडीने कृषी, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांमार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी स्थानिक शेतकरी प्रतिनिधी, जनप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने मदत व पुनर्वसन उपाययोजना सुरू करण्याचे आवाहन केले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *