बुलढाणा प्रतिनिधी ;-
“समाजसेवा, संस्कृती, अध्यात्म आणि आनंद — या चौघांचा संगम घडवणारा हा दिवस बुलढाण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल,” अशा भावना व्यक्त करत लहाने ले-आऊट परिसरात उभारण्यात आलेल्या ‘वृद्धाश्रम’, ‘हॅपी थॉट्स भवन’ आणि ‘एंटरटेनमेंट सेंटर’ या त्रिसदन प्रकल्पांचा भव्य लोकार्पण सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.
या तीन वास्तू —
वृद्धाश्रम (सेवानिवृत्त कल्याणकारी व ज्येष्ठ नागरिक भवन)
हॅपी थॉट्स भवन (तेजज्ञान ध्यान केंद्र)
एंटरटेनमेंट सेंटर
— या केवळ इमारती नसून बुलढाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक प्रगतीचे जिवंत प्रतीक ठरल्या आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. मधुकरराव पऱ्हाड यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीमध्ये युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. ओमसिंग राजपूत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश पांडे, आणि शिवसेना मुख्य निरीक्षक श्री. विजयजी अंभोरे यांचा समावेश होता.
तसेच या सोहळ्यात मधुसूदन कुलकर्णी, वसंतराव चिंचोले, उदय देशपांडे, जिजाबाई राठोड, अनुजाताई सावळे, गजेंद्र दांदडे, वैशाली ठाकरे, पद्माताई परदेशी, वर्षाताई तायडे, विठ्ठलराव येवले, पुष्पाताई धूड, रामेश्वरी चव्हाण, दीपक सोनुने, मकरंद पिंपळे, श्रीकांत गायकवाड, सुजाता बोदडे, बाळासाहेब धूड, प्रभाकर काळवाघे, गोविंदा खुमकर, कि.वा. वाघ, सौभाग्ये सर, सपकाळ सर, अलोक बाहेकर, प्रमोद पवार, बंडू आसाबे, नितीन सुपे, श्रीकृष्ण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्या भाषणात मी म्हटले —
“ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करण्यासाठीचे ठिकाण, ध्यानधारणेद्वारे मानसिक शांततेचा संदेश, वाचनालयातून ज्ञानवृद्धी आणि मनोरंजन केंद्रातून आनंदाचा अनुभव — हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा माझ्या जनसेवेच्या संकल्पनेचा साकार रूप आहे. या वास्तू बुलढाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाचा नवा अध्याय लिहतील.”
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, “ही केवळ पायाभरणी नाही, तर बुलढाणा शहराला समाजसेवा, संस्कृती, अध्यात्म आणि शिक्षणाच्या दिशेने नेणारा ऐतिहासिक टप्पा आहे,” असे मत व्यक्त केले.
या त्रिसदन प्रकल्पामुळे शहराच्या सामाजिक एकात्मतेला नवे बळ, आणि विकास प्रवासाला नवी दिशा मिळाल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले.
Users Today : 38