साखरखेर्डा येथील सुमित ज्ञानेश्वर गवई यांना “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा प्रतिनिधी ;-
साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित ज्ञानेश्वर गवई यांना २०२५ चा “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार असून, गवई यांच्या सामाजिक व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान पुणेचा मानाचा पुरस्कार
शिवप्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष श्री. मदनजी सिताराम रेंगडे पाटील आणि उपाध्यक्ष श्री. अच्युत सिताराम पाथरकर यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली.
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग, साहित्य, विज्ञान, कला, कृषी, प्रशासन आणि पर्यावरण या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार वितरण सोहळा
या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा
दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी
साई पार्क सोसायटी, आळंदी देवाची, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

गवई यांच्या कार्याचा गौरव
सुमित ज्ञानेश्वर गवई यांनी मागील काही वर्षांत सामाजिक विकास, युवक संघटन, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती अभियानांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत शिवप्रतिष्ठान पुणे यांनी त्यांना “महाराष्ट्र रत्न” या मानाच्या पुरस्कारासाठी निवडले आहे.

परिसरात कौतुकाचा वर्षाव
या पुरस्काराच्या घोषणेनंतर साखरखेर्डा परिसरात गवई यांच्या कार्याचे कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक संस्था, मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“हा सन्मान माझ्या कार्याचा नव्हे, तर समाजाच्या आशिर्वादाचा आहे. हा गौरव मला आणखी जबाबदारीची जाणीव करून देतो,”
असे सुमित ज्ञानेश्वर गवई यांनी सांगितले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *