शेलुखडसे : दहा वर्षांच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू — ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांचा संताप

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी

रिसोड
तालुक्यातील शेलुखडसे गावातील दहा वर्षांचा *वेदांत गणेश खडसे* या चिमुकल्याचा *विषारी साप चावल्याने मृत्यू* झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटना *१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास* घडली.

शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने वेदांत आपल्या आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. शेतात काम सुरू असताना कोब्रा जातीच्या अतिविषारी सापाने त्याला चावा घेतला. लगेचच त्याला *रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात* दाखल करण्यात आले. मात्र, उपचारास *उशीर झाल्याने आणि अँटीव्हेनम औषध देण्यात झालेल्या विलंबामुळे* या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

ग्रामस्थांच्या मते, रुग्णालयात दाखल होताच योग्य वैद्यकीय उपचार न करता नेहमीप्रमाणे “रेफर” करण्याची पद्धत राबवली गेली. प्राथमिक उपचार थातूरमातूर करूनच वेदांतला *वाशिम येथे पाठवण्यात आले*, मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
यामुळे *रिसोड ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांत प्रचंड रोष* व्यक्त होत आहे.
सर्पदंशाच्या घटनांची मालिका

शेलुखडसे परिसरात सर्पदंशाच्या घटना सातत्याने वाढत असून ही *फक्त एका महिन्यातील दुसरी घटना* आहे. गेल्या *दोन वर्षांत आठ सर्पदंश प्रकरणांपैकी तीन मृत्यू* झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या सर्व प्रकरणांमध्येही प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना वाशिम येथे रेफर करण्यात आल्याचे नमूद करण्यात येत आहे. गावात शोककळा आणि भीतीचे वातावरण

सर्पदंशामुळे *दोन वर्षांपूर्वी गार्गी विशाल खडसे* या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता, तर त्याआधी *राजू बळीराम खडसे* या शेतकऱ्याचा जीव गेला होता.
वेदांत हा या गावातील सर्पदंशामुळे मृत्यू पावलेला *तिसरा बळी* ठरला आहे. परिणामी गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी सांगितले की, शेलुखडसे व पेबील परिसरात सापांची वाढलेली संख्या आणि आरोग्य यंत्रणेची निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
*”प्रत्येक वेळेस रुग्णांना केवळ रेफर करून जीव धोक्यात घालण्यात येतो. वेळेत अँटीव्हेनम दिले असते तर हे मृत्यू टाळता आले असते,”* असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी *वरिष्ठ आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच ग्रामीण रुग्णालयात **२४ तास सर्पदंश उपचार केंद्र सुरू करावे*, अशी जोरदार मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेने शेलुखडसे गाव शोकमग्न झाले असून, गावकऱ्यांमध्ये सर्पदंशाबद्दल दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

0 8 9 4 6 4
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *