बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ;-
नांदुरा :
पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथे कला शाखा (सन 2005 बॅच)* च्या माजी विद्यार्थ्यांचे *स्नेहसंमेलन सोहळा – 2025 अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले. तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या या बॅचने महाविद्यालयातील आठवणींना नवसंजीवनी दिली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. अंबादासजी कुलट, प्राचार्य श्री. शिवाजी महाविद्यालय, अमरावती यांनी भूषविले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हेमलता भावसार, प्रा. डॉ. सुमती भोगे-देशमुख, प्रा. रविकांत गावंडे, प्रा. संजय भोगे, प्रा. क्षिरसागर, प्रा. राजेश गावंडे, प्रा. डॉ. सचिन मुखमाले, प्रा. लाहूडकर सर, एकनाथ अवचार, श्रीधर झाडोकार, सदाशिव गोल्डे, गजानन डांगे आणि विष्णु डाबेराव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून सभागृहात भावनिक आणि अभिमानास्पद वातावरण निर्माण झाले.
जुन्या आठवणी आणि अनुभवांची देवाणघेवाण
माजी विद्यार्थी दिपक अढाव, निलेश राठोड, संतोष पांडे, वृषाली गावंडे-शिंगोटे, अमोल भाकरे यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रा. डॉ. हेमलता भावसार, प्रा. डॉ. सुमती भोगे-देशमुख, प्रा. क्षिरसागर, प्रा. संजय भोगे, श्रीधर झाडोकार, सदाशिव गोल्डे यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अंबादासजी कुल यांनी २००५ च्या बॅचने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि या स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
सन्मान आणि स्मृतीचिन्ह वितरण
या सोहळ्यात उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित* करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. जयंत तायडे, सूत्रसंचालन दिनेश धामोडकर-पाटील, तर आभार प्रदर्शन सतीश हातळकर यांनी केले.
संगीताच्या स्वरांनी उजळला संध्याकाळचा सत्र
दुसऱ्या सत्रात “चंद्र आहे साक्षीला” फेम गायक विनोद धनद्रव्ये यांनी आपल्या संगीत स्वरसाजाने सभागृह मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. सचिन मुखमाले आणि एकनाथ अवचार सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या स्नेहसंमेलनात २००५ बॅचचे माजी विद्यार्थी *पुरुषोत्तम थारकर, कपील काळे, विवेक नारखडे, महादेव वैतकर, राजू इंगळे, मंगेश मापारी, सुदाम एकडे, गजानन चिमकर, आत्माराम नथले, अतुल नायसे, गोपाल तोमर, संजय सपकाळ, अनिल ढोले, सतीश हातळकर, ओमप्रकाश सारंगधर तायडे, वृषाली गावंडे-शिंगोटे, स्मिता बोरसे, वर्षा घामोडकर-गावंडे आणि इतर सहपरिवार उपस्थित होते.
या भावनिक स्नेहसंमेलनाने महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांमधील बंध पुन्हा दृढ झाले — पुंडलिक महाराज महाविद्यालयाचा हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
Users Today : 27