बुलढाणा प्रतिनिधी :-
शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेत, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. या संदर्भात बाजार समितीचे सभापती प्रा. बळीभाऊ मापारी यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून मशीनमध्ये अंगठा देऊन नाफेड नोंदणी करणे बंधनकारक आहे.राज्यभरातील २५ बाजार समित्यांना शासनाने नाफेडमार्फत खरेदीची परवानगी दिली असून, त्यात लोणार बाजार समितीचा समावेश असल्याचा अभिमान आहे. शेतकरी बांधवांनी सातबारा, आठ-अ, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बाजार समितीत येऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रा. मापारी यांनी केले.१५ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होणार असून, सुलतानपूर व लोणार बैल बाजार येथे सोयाबीन खरेदी केंद्रे कार्यरत राहतील. खरेदीसाठी सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा किंवा माती नसावी, अशी सूचना देण्यात आली आहे. माती असलेले धान्य चाळणी करून घेतले जाणार आहे.
प्रा. मापारी म्हणाले, “शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे सोने कमी भावात विकू नये. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नाफेडमार्फत विक्री करून आपल्या घामाला योग्य दर द्या.या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख भगवान पाटील सुलताने, पांडुरंग सरकटे, युवक तालुकाप्रमुख गजानन मापारी, माजी नगरसेवक सुबोध दादा संचेती, राहुल मापारी, ऋषिकेश मापारी, कैलास जायभाय, पमु मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासनाचा विश्वास — दोन्ही हातात हमीभावाचा दिलासा!
Users Today : 22