बुलडाणा प्रतिनिधी;-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून मासरूळजवळील गुम्मी येथे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम* उत्साहात पार पडला. सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे सूत्रसिद्ध शिष्य संदीपपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनात्मक कीर्तनातून उपस्थित जनसमुदायाला सामाजिक जागृतीचा संदेश दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि शिक्षणाचा संदेश
संदीपपाल महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक एकोपा* यांसारख्या गंभीर सामाजिक विषयांवर विनोदी पण परिणामकारक शैलीत प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी वाणीतून ग्रामस्थांना सुसंस्कार, एकता आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश मिळाला.
कार्यक्रमाला मोठी उपस्थिती*
या कीर्तन कार्यक्रमाला गुम्मी, मासरूळ आणि परिसरातील गावांमधील नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपाली हुंडीबाले* होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून शंकर अपार, सतीश सपकाळ आणि के. टी. पायधन यांची उपस्थिती लाभली.
मनोज दांडगे यांचे विचार — “राजकारणासोबत समाजजागृती हवी”
या प्रसंगी मनोज दांडगे म्हणाले,
“मासरूळ सर्कलमधील नागरिकांसाठी केवळ राजकीय काम न करता, सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन करणे ही माझी प्राथमिकता आहे. संदीपपाल महाराजांसारख्या प्रबोधनकारांच्या विचारांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. विकासकामे आणि समाजजागृतीचे हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील.”
दांडगे यांनी सर्कलमध्ये विकास आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे *प्रास्ताविक राजेंद्र नरोटे* यांनी केले, तर *सूत्रसंचालन विजय नरोट यांनी प्रभावीपणे पार पाडले.
गुम्मी गावातील हा समाजप्रबोधनाचा उपक्रम नागरिकांच्या मनावर कायमची छाप सोडून गेला
Users Today : 26