बुलढाणा : सुलतानपूर येथे अत्याधुनिक योग व निसर्गोपचार रुग्णालयाला २५ एकर जमिन मंजूर

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी ;-

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे *योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेच्या अत्याधुनिक १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २५ एकर जमिन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* महसूल आणि वनविभाग मंत्रालयाने ४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला असून, या निर्णयामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रयत्न फलद्रूप
केंद्रिय मंत्री *प्रतापराव जाधव* यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “हे रुग्णालय लोणार आणि परिसरातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांना यामुळे नवा आयाम मिळेल.”
रुग्णालयासाठी विनामूल्य जमिन
बुलढाणा जिल्हा प्रशासनाने सुलतानपूर (गट क्रमांक ८८५, क्षेत्र २९.६२ हेक्टर आर) येथील सरकारी जमिनीपैकी *२५ एकर क्षेत्र रुग्णालयासाठी देण्याचा प्रस्ताव* राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे* यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला.
या चर्चेनंतर महसूल विभागाच्या सहाय्यक सचिव ज्ञा. ल. सुळ यांच्या स्वाक्षरीने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय काढण्यात आला आहे. जागतिक दर्जाचे रुग्णालय लोणार सरोवर परिसरात
या निर्णयानुसार, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे उभारण्यात येणारे *१०० खाटांचे अत्याधुनिक योग व निसर्गोपचार रुग्णालय हे केवळ बुलढाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी उपकारक ठरणार आहे.
लोणार सरोवरासारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाजवळ रुग्णालय उभारले जाणार असल्याने *आरोग्यसेवा आणि पर्यटनाचा समन्वय साधणारा नवा केंद्रबिंदू निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाने दिलेल्या जमिनीबद्दल केंद्रिय मंत्री *प्रतापराव जाधव* यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचे आभार मानले असून, या निर्णयामुळे लोणार तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

0 9 5 5 3 6
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *