बुलढाणा जिल्ह्यात १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या — जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांचे आदेश

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी ;-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे —

  • पोलीस निरीक्षक आशिष साहेबराव रोही — नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथून आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे बदली.

  • नितिनकुमार पाटील, ठाणेदार शेगाव शहर — जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे ठाणेदारपदी बदली.

  • श्रीकांत निचळ, जळगाव जामोद पोलीस निरीक्षक — पासपोर्ट शाखा, बुलढाणा येथे बदली.

  • निमिष मेहाजे, ठाणेदार पोलीस स्टेशन होणार — शेगाव येथे बदली.

  • प्रकाश सदगिर, आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा — लोणार ठाणेदारपदी बदली.

  • संग्रामसिंह पाटील, ठाणेदार चिखली — प्रभारी अधिकारी सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे बदली.

  • भूषण गावंडे, पासपोर्ट शाखा बुलढाणा — चिखली ठाणेदारपदी बदली.

  • चंद्रकांत पाटील, ठाणेदार सोनाळा — पिंपळगाव राजा ठाणेदारपदी बदली.

  • मुकेश गुजर, ठाणेदार पिंपळगाव राजा — वाचक, उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर येथे बदली.

  • संदीप काळे, मलकापूर ग्रामीण — सोनाळा ठाणेदारपदी बदली.

  • भागवत मुळीक, खामगाव शहर पोलीस स्टेशन — हिवरखेड ठाणेदारपदी बदली.

  • कैलास चौधरी, ठाणेदार हिवरखेड — नांदुरा ठाणेदारपदी बदली.

  • हेमराज कोळी, एमआयडीसी मलकापूर — दोषसिद्ध विभाग, डायल 112 प्रभारी अधिकारीपदी बदली.

  • नरेंद्र पेंदारे, नांदुरा पोलीस स्टेशन — एमआयडीसी मलकापूर येथे बदली.

  • दत्ता नरवाडे, देऊळगाव राजा पोलीस उपनिरीक्षक — पोलीस स्टेशन जलंब येथे बदली.

  • क्रांती ढाकणे, नांदुरा पोलीस उपनिरीक्षक — पोलीस स्टेशन नांदुरा येथे बदली.

  • रंजन अबाने, शिवाजीनगर पोस्टे — नांदुरा येथे बदली.

  • कोमल शिंदे, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा — शिवाजीनगर येथे बदली.

या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

0 9 5 5 3 6
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *