सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कोलारा येथे पार पडले आरोग्य शिबिर

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :-
चिखली तालुक्यातील कोलारा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या यात्रेचे औचित्य साधून स्वर्गीय सुभद्राबाई माधवराव सोळंकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ३ नोव्हेंबर रोजी श्री सिद्धेश्वर संस्थान येथे पार पडलेल्या या आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ. अतुल सिद्धेश्वर सोळंकीडॉ. अंजली गणेशराव सोळंकी यांच्या वतीने करण्यात आले. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसह गावातील नागरिक, महिला आणि बालकांची तपासणी करण्यात आली.

डॉ. अतुल सोळंकी व डॉ. अंजली सोळंकी यांनी विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना आवश्यक सल्ला व औषधे दिली. ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपसरपंच विष्णू माधवराव सोळंकी, पीएसआय योगेश पवार, राहुल गवले, योगेश गवळी, रवी सोळंकी, सुरज सोळंकी, गजानन सोळंकी, धनंजय सोळंकी, आदित्य सोळंकी, नंदू इंगळे, जीवन परिहार, गोवर्धन परिहार, ज्ञानेश्वर जाधव आदींनी परिश्रम घेतले.

यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे आरोग्य शिबिर भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *