डोणगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त विवेकानंद आश्रमातून संत शुकदास महाराज रथयात्रेचे भव्य आयोजन

Khozmaster
2 Min Read

डोणगाव  प्रतिनिधी :-
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त विवेकानंद आश्रम, डोणगाव येथून आदिवासी तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ भोरद येथे संत शुकदास महाराजांच्या रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक व धार्मिक उत्साहात निघालेल्या या रथयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत व पूजन करण्यात आले.

रथयात्रेच्या स्वागतासाठी डोणगाव गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप तालुका अध्यक्ष सुरेश फिसके, डॉ. ज्ञानेश्वर अजगर, हितेश सदावर्ते, सचिन गाभणे, अबरार खान, सोहेल खान, गणेश पळसकर, हेमराज शमां, हमीद मुल्लाजी, रामेश्वर पळसकर, गणेश लहाने, सुबोध आखाडे यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आदी उपस्थित होते.

रथयात्रेचे डोणगाव येथे आगमन होताच संत गजानन महाराज उत्सव समितीच्या वतीने डॉ. गजानन उल्हामाळे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांनी रथयात्रेचे स्वागत केले.
बाळासाहेब आखाडे व सहकाऱ्यांनी जानकी हॉटेल येथे चहापान व्यवस्था करून रथपूजन केले.

बसस्थानक परिसरात सुरेश फिसके मित्र मंडळाच्या वतीने संत शुकदास महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. तसेच माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या संपर्क कार्यालयातही रथयात्रेचे स्वागत सोहळा पार पडला.

या प्रसंगी आत्मानंद थोरहाते (जनसंपर्क प्रमुख), पंढरीनाथ शेळके, गजानन शास्त्री, शिवदास सांबापुरे, तसेच डोणगाव पोलिस ठाण्याचे एएसआय मंगेश खडसे, हर्ष सहगल आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या धार्मिक सोहळ्यामुळे डोणगाव आणि परिसरात भक्तीभाव, उत्साह आणि सामाजिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *