पोलीस ठाण्यात पदोन्नतीची लाट – ठाण्यात आनंदाचे वातावरण

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी ;- देऊळगाव राजा पोलीस ठाण्यातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे ठाण्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांच्या सेवेतून जनतेचा विश्वास जपणाऱ्या या अधिकाऱ्यांनी ठाण्यात आदर्श निर्माण केला आहे.
पदोन्नती मिळालेले अधिकारी :
– समाधान पाटील बंगाळे – हेडकॉन्स्टेबल
– विलासराव काकड – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (API)
– प्रमोद मुळे – सहाय्यक उपनिरीक्षक (ASI)
– संजय गोरे – पोलीस हवालदार
– काकडे मॅडम – पदोन्नती (महिला पोलीस अधिकारी)
खुफिया विभागात कार्यरत असलेले समाधान बंगाळे हे संवेदनशील वर्तन आणि जबाबदार कामगिरीसाठी ओळखले जातात. विलासराव काकड यांनी दीर्घकाळ अत्यंत निष्ठेने जबाबदारी पार पाडली आहे. प्रमोद मुळे, संजय गोरे आणि काकडे मॅडम यांनीही शिस्तबद्ध आणि प्रभावी सेवेमुळे पदोन्नती मिळवली.
बढतीचा सन्मान
ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब आणि API हेमंत शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बढतीची शोल्डर बॅजेस लावून त्यांचा सन्मान केला. या वेळी ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहकाऱ्यांनी सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रामाणिक, जबाबदार आणि शिस्तबद्ध सेवेमुळे या अधिकाऱ्यांनी ठाण्याची प्रतिमा अधिक बळकट केली असून, पदोन्नतीमुळे ठाण्यात समाधान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *