खामगाव प्रतिनिधी ;-
आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज आपल्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. निवडणूक संघटन, प्रभागनिहाय रणनीती, जनसंपर्क मोहीम आणि उमेदवारांचे नियोजन या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला प्रमुख उपस्थिती—
● बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *माजी आमदार राहुल बोंद्रे*
● पक्ष निरीक्षक *प्रकाश तायडे*
● प्रदेश सरचिटणीस *रामविजय बुरुंगुळे*
● पक्षनेते *ज्ञानेश्वर पाटील*
● अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष *मो. श्याम रझा*
● इच्छुक उमेदवार
● तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते
बैठकीदरम्यान संघटनाची बांधणी, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस लढा उभा करण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका अधोरेखित करण्यात आली. आगामी निवडणुकीत जनमताचा कौल मिळवण्यासाठी प्रभावी संवाद, प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेशी सातत्याने जोडले जाण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित झाले.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उपस्थिती पाहता, खामगाव नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले.
खामगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
0
8
9
4
8
1
Users Today : 11
Leave a comment