मिशन परिवर्तन’ निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी ;- जिल्हा पोलीस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ (वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत आयोजित नशामुक्तीवर आधारित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन आज, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिस मुख्यालयातील प्रभा हॉल येथे करण्यात आले.
ऑगस्ट–सप्टेंबर २०२५ दरम्यान ही स्पर्धा जिल्हाभरात घेण्यात आली होती, ज्यास हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
सोहळ्यास प्रमुख उपस्थिती—
* जिल्हा पोलीस अधीक्षक *निलेश तांबे*
* अपर पोलीस अधीक्षक *अमोल गायकवाड*
* जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष *रणजीतसिंग राजपूत*
कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या प्रस्ताविकाने झाली. निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी पथनाट्यही सादर करण्यात आले.
*एसपी निलेश तांबे यांचे मार्गदर्शन:*
तांबे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली आणि ‘चार आर’—Read, Revise, Reproduce, Result—यांचे महत्त्व स्पष्ट केले. मिशन परिवर्तनद्वारे करण्यात येणाऱ्या उपक्रमांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले
*अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन:*
गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कोणतीही नशा आयुष्याचा मार्ग बदलू शकते, त्यामुळे योग्य दिशेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नशेची सक्ती झाली तर त्वरित विरोध करा”—असेही ते म्हणाले.
*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांचे मनोगत:*
राजपूत यांनी सांगितले की स्पर्धेस जिल्हाभरातून तब्बल *८ ते ९ हजार विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग* मिळाला. पुढेही पोलीस विभागासोबत संयुक्तपणे जनजागृतीचे उपक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमास पोलीस अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन *डॉ. गायत्री सावजी, तर आभार प्रदर्शन **मृणाल सावळे* यांनी केले

0 9 5 5 3 7
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *