नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपकडून उमेदवार मुलाखती — नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची उपस्थिती

KHOZ MASTER
1 Min Read

मलकापूर प्रतिनिधी ;- मलकापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी गेल्या कार्यकाळातील आपले काम, सामाजिक बांधिलकी, संघटनातील सहभाग आणि प्रभागातील विकासाबाबतचा अहवाल सादर केला. आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी अधिक भक्कम करण्यासाठी उमेदवारांना मार्गदर्शनही करण्यात आले.
या वेळी आमदार चैनसुखजी संचेती, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
निवडणुकीतील रणनीती मजबूत करण्यासाठी झालेली ही बैठक मलकापूर भाजपच्या संघटनात्मक तयारीला अधिक गती देणारी ठरली

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *