नगरपालिका निवडणुकीपूर्व काँग्रेसची आढावा बैठक; इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी ;-               

चिखली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस आज मोठी उपस्थिती लाभली. पक्ष निरीक्षक *राजेंद्र राख, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सचिव *रामविजय बुरुंगूले* यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, संघटनाची तयारी, प्रभागनिहाय कामकाज, इच्छुक उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर चर्चा झाली.
इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून काँग्रेसची *एकजूट आणि संघटनशक्ती* स्पष्टपणे जाणवली. चिखली नगरपालिकेत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *