नगर परिषद निवडणुकीसंदर्भातील काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बैठकीचे जाहीर सभेत रूपांतर

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी ;-
मेहकर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेली काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बैठकीला एवढी मोठी गर्दी झाली की ती थेट जाहीर सभेचे रूप धारण झाली.
या वेळी *बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, पक्ष निरीक्षक **राजेंद्र राख, आमदार **धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष **लक्ष्मणराव घुमरे, प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर, प्रदेश सचिव **रामविजय बुरुंगले, माजी सभापती **अशोकराव पडघान*, देवानंद पवार यांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मेहकर शहरातील राजकीय वातावरणात काँग्रेसचा वाढता जनाधार या बैठकीत स्पष्टपणे जाणवत होता. आगामी निवडणुकीत पक्षाची भक्कम रणनीती, संघटन बळकटी आणि घराघरात पोहोचणारा जनसंपर्क यावर विशेष भर देत नेत्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *