मेहकर प्रतिनिधी ;-
आज मेहकर येथील माझ्या जनसंवाद कार्यालयात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी सपकाळ, आमदार धीरज भाऊ लिंगाडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्ष निरीक्षक राजाभाऊ राख तसेच प्रदेश सरचिटणीस मा. शामभाऊ उमाळकर यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या वेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पक्ष संघटन, आगामी निवडणुका, जनतेच्या प्रश्नांवरील उपाययोजना आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटी याबाबत मैत्रीपूर्ण चर्चा झाली.
कार्यक्रमास जिल्हा उपप्रमुख मा. आशिष भाऊ रहाटे, तालुकाप्रमुख मेहकर निंबा भाऊ पांडव, शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, युवा तालुकाप्रमुख ऍड. आकाश भाऊ घोडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनसंवाद कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना अधिक गतीने न्याय देण्याचा निर्धार या भेटीदरम्यान व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट; मान्यवरांचा सत्कार
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment