लोणार नगर पालिका निवडणूक : प्रशासन सज्ज — २१ मतदान केंद्रे, १९,७८२ मतदार

Khozmaster
1 Min Read

लोणार प्रतिनिधी ;-

लोणार नगर पालिकेची निवडणूक पूर्णपणे शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगरपालिका व तहसील प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी दिली.
दि. ८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. ठाकरे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण पाटील, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली केसकर, तहसीलदार विजय सवडे, तसेच सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. ठाकरे यांनी पुढील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले—
निवडणुकीचे वेळापत्रक व प्रक्रिया
नामनिर्देशन सादरीकरण व पडताळणी
मतदारसंख्या व मतदान केंद्रांची व्यवस्था
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन
मतदान केंद्रांवरील सोयी व सुरक्षा
निवडणुकीची प्रमुख माहिती :
एकूण १० प्रभाग
एक नगराध्यक्ष, तसेच प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक — एकूण २० लोकप्रतिनिधी
एकूण मतदार : १९,७८२
पुरुष : १०,९३६
महिला : ९,६४६
एकूण मतदान केंद्रे : २१

0 9 5 5 3 7
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *