विहिरीत तरंगताना इसमाचा मृतदेह आढळून खळबळ बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

Khozmaster
1 Min Read

देऊळघाट प्रतिनिधी ;-

देऊळघाट येथे आज, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास, पैनगंगा नदीकाठी बसथांब्याच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अचानक मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृत व्यक्तीची ओळख मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद (वय ४९) अशी झाली असून ते मूळचे मलकापूर येथील रहिवासी होते. काही काळापासून ते देऊळघाट येथे वास्तव्यास होते.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे

0 9 5 5 3 7
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *