जालना जिल्हा प्रतिनिधी ;-
मंठा तालुक्यातील गेवराई येथे नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे मोफत बियाणे वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने ज्वारी बियाण्याच्या ५ किलोच्या पिशव्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या.
या उपक्रमाचे वितरण शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून अनुदान, पिकनुकसान आणि शेतकरी समस्यांबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
उपक्रमादरम्यान शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
Users Today : 18