शेगाव प्रतिनिधी ;-
जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीचे सविस्तर नियोजन, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची जबाबदारी, तसेच जनसंपर्क मोहीम राबविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. इच्छुक उमेदवारांना आपल्या कार्याचा अहवाल सादर करून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि शिवसेनेच्या जनहितकारी कार्याचा ठसा उमटवावा, असे मार्गदर्शन वरिष्ठ नेत्यांनी केले.
बैठकीदरम्यान पक्ष एकजुटीने कार्य करून नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील धोरणात्मक दिशा निश्चित करण्यात आली.
या वेळी आ. संजय गायकवाड, मा. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत, संतोषराव डिवरे, तसेच युवासेना घाटाखालील लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 22