बुलढाणा प्रतिनिधी ;-
बुलढाणा शहरात मुस्लिम समाजातील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली आहे. शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधवांनी “विकास आणि सर्वसमावेशकतेच्या शिवसेना कार्यशैलीवर विश्वास” व्यक्त करत हा पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी सलमान भाई, अजीम भाई, पप्पू चाचा, बबलू भाई, जावेद भाई, शेख दानिश, शाकिब भैय्या, अरबाज भाई, अमीर भाई, सिमरोज भाई, रिहान भाई, कामरान भाई, जावेद भैया मंडपवाले, मुदस्सर भैय्या, अतार भाई यांच्यासह अनेक उत्साही युवकांचा सहभाग होता.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, नासिर भाई विटावाले तसेच शेरीअली चौक परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी स्वागतपर भाषणात सांगण्यात आले की,
“शिवसेना ही धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन प्रत्येक समाजघटकाचा सन्मान करणारी आणि जनतेच्या हितासाठी झटणारी संघटना आहे. बुलढाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांनी एकदिलाने पुढे यावे.”
कार्यक्रमाच्या शेवटी नवप्रवेशित युवकांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्ष धोरणांवर आणि लोककल्याणकारी भूमिकेवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बुलढाण्यात मुस्लिम युवकांचा शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment