शेगाव प्रतिनिधी ;-
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या पदाधिकारीांची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक शेगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली.
बैठकीस केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले. या वेळी प्रभागनिहाय नियोजन, प्रचारयोजना, जनसंपर्क मोहिम आणि उमेदवारी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की,
“नगरपरिषद निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आणि विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलण्यासाठीची सुवर्णसंधी आहे. प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि शिवसेनेच्या जनहितकारी भूमिकेचा ठसा उमटवावा.”
कार्यक्रमास शिवसेना सहसंपर्कप्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रा. बळीराम मापारी, संतोष डीवरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संघटनेची ताकद, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि प्रामाणिक जनसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. तर जिल्हा पातळीवरील नेतृत्वाने आगामी निवडणुकीला “मतदारसंघाच्या विकासाची नवी दिशा देण्याची ऐतिहासिक संधी” असे संबोधत सर्व पदाधिकाऱ्यांना कटिबद्धतेने कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीचा समारोप “जय महाराष्ट्र” च्या घोषणांनी झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा, एकसंघता आणि विजयाचा आत्मविश्वास दिसून आला.
Users Today : 22