शेगाव प्रतिनिधी ;-
शेगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खामगाव येथे पार पडल्या. या बैठकीत उमेदवारांनी आपापल्या कार्याचा तसेच आगामी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला.
यावेळी भाजपा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक श्री. सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. बैठकीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारांनी पक्षवृद्धी, जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि प्रभागनिहाय विकास आराखड्याविषयी माहिती देत आगामी निवडणुकीसाठी आपली तयारी दृढ असल्याचे सांगितले. पक्ष संघटनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात संपन्न झाली असून, आगामी निवडणुकीत शेगाव नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Users Today : 22