खामगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

Khozmaster
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी ;-

खामगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. पक्ष संघटनाने घेतलेल्या या बैठकीत सर्व इच्छुकांनी आपल्या कार्याचा आढावा सादर करत आगामी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.
बैठकीदरम्यान उमेदवारांनी पक्षासाठी केलेल्या कार्याचा, प्रभागनिहाय विकास आराखड्याचा आणि जनसंपर्क उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उमेदवारांच्या योजनांकडे लक्षपूर्वक ऐकून मार्गदर्शन करत होते.
या बैठकीत भाजपा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक श्री. सागरदादा फुंडकर प्रमुख उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पक्षातर्फे सांगण्यात आले की, खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष एकसंघपणे सज्ज आहे. पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित केली जाईल, आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नेतृत्वाला संधी दिली जाईल.
बैठकीचे वातावरण उत्साहवर्धक व सकारात्मक असून, आगामी निवडणुकीत खामगाव नगरपरिषदेत भाजपा झेंडा फडकविण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *