मेहकर प्रतिनिधी ;–
नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हा पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल
नगराध्यक्ष पद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, सर्वच पक्षांनी आपापली ताकद या निवडणुकीत लावण्याची तयारी सुरू केली आहे. तथापि, महायुतीमध्ये सामील असूनही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यावेळी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांवर युती झाली तर युतीच्या माध्यमातून, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आणि नंतर बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे की, जर महायुतीमध्ये योग्य जागा आणि सन्मान मिळाला तर आम्ही युती करणार, अन्यथा पक्ष स्वतंत्रपणे आपल्या ताकदीवर निवडणुकीत उतरलेला असेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “स्थानिक निर्णयाचा पूर्ण अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आलेला आहे. मेहकर शहरात आमचे संघटन सक्षम असून, अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडे आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे *जनता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)*ाच्या पाठीशी उभी राहील, असा मला ठाम विश्वास आहे.”
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष गजानन सावंत, शहराध्यक्ष सुमेर खान, युवक जिल्हा कार्याध्यक्ष रवि मिस्कीन तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18