बुलढाणा प्रतिनिधी ;-
जानेफळ सर्कलमधील भावी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अॅड. माधुरी देवानंद पवार यांचे नाव जोरदार चर्चेत असताना, त्यांची महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी झालेली नियुक्ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या निर्णयामुळे जानेफळ परिसरात सर्वसामान्य जनतेत आनंदाचे वातावरण असून, अॅड. पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
९ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. माधुरी पवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी आणि आकर्षक सूत्रसंचालनाने उपस्थित नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मने जिंकली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत दुसऱ्याच दिवशी अॅड. माधुरी देवानंद पवार यांची महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती जाहीर केली.
यामुळे जानेफळ सर्कलमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक स्तरावर अॅड. पवार यांच्या नेतृत्वगुणांबद्दल आणि वक्तृत्वकलेबद्दल स्तुतीचा वर्षाव होत आहे.
अॅड. माधुरी पवार या काँग्रेस नेते देवानंद पवार यांच्या कन्या असून, शिक्षण, सामाजिक कार्य आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि जबाबदार कार्यशैलीमुळे त्या पुढील काळात जानेफळ सर्कलच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा ठरण्याची चिन्हे आहेत
Users Today : 22