अंजनी बु. शेतशिवारातील हाणामारीत एकाचा मृत्यू — दोघे अत्यवस्थ, ९ आरोपी ताब्यात

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी ;-
अंजनी बु. (ता. चिखली) शेतशिवारात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण अत्यवस्थ, तसेच सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोणगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही घटना जमिनीच्या वादातून उद्भवली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
फिर्यादी विकार खा जाबीर खा पठाण (१८, रा. मंगरुळ नवघरे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर रोजी ते आपल्या आई-वडील आणि नातेवाईकांसह अंजनी बु. शिवारातील शेतात गेले असताना सय्यद मंजूर सय्यद बिराम (४५) व त्यांचे साथीदारांनी लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात फिर्यादीचे फुफा सय्यद अथास सय्यद वाहेद यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी क्रमांक १ ते ९ —
सय्यद मंजूर सय्यद बिराम, सबबद आसिफ सय्यद मंजूर, सय्यद समीर सय्यद बशीर, सय्यद रहीम सय्यद बिराम, सय्यद इमरान सय्यद रहीम, सय्यद रफिक सय्यद मुनाफ, आरेफाबी सय्यद मंजूर, फरीदाबी सय्यद जमीर आणि सुलतानाबी सय्यद रहीम — सर्व रा. नागापूर — यांना अटक केली आहे.
सदर प्रकरणी कलम १०३(१), १०९(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, २९६, ३५१(२) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार अमरनाथ नागरे पुढील तपास करीत आहेत.
दुसरीकडे, सय्यद इमरान सय्यद रहीम (रा. नागापूर) यांनी देखील प्रत्युत्तरात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार जाबीर खा पठाण, विकार खा बशीर खा पठाण, हिना बी इमरान खा पठाण, रिजवानाबी जाबीर खा पठाण, इमरान खा शब्बीर खा पठाण (सर्व रा. मंगरुळ नवघरे), तसेच काही अमडापुर आणि लाखनवाडा येथील व्यक्तींवरही कलम ११८(१), १८९(२), १९९(२), १९१(३), १९०, ३५२ BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.का. संजय घिके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी सांगितले की, “जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले असून, सखोल तपास सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *