बुलढाणा प्रतिनिधी ;-
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्यभरात कडधान्य व तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
अवकाळी पाऊस, घटलेली उत्पादकता आणि घसरलेले बाजारभाव यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर नाफेडच्या राज्य शाखेकडून ‘विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, जानेफळ’ या खरेदी केंद्राची ‘मॉडेल खरेदी केंद्र’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या केंद्रावर शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत —
शेतकरी प्रतीक्षालय
सीसीटीव्ही निरीक्षण प्रणाली
स्वच्छता व प्रतवारी केंद्र
मॅग्नेट डेस्टोनर यंत्र
ओलावा असलेल्या शेतमालासाठी वाळवणीची सुविधा
बारदान्याचा पुरेसा साठा, जेणेकरून खरेदीमध्ये अडथळा येऊ नये
तसेच केंद्रावर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सतत कार्यरत राहणार असून, शेतकऱ्यांना सर्व प्रक्रियेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्यूसर कंपनी लि., जानेफळ यांच्या वतीने परिसरातील सर्व कडधान्य व तेलबिया उत्पादक शेतकरी बांधवांना नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 22