मेहकर प्रतिनिधी ;-
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव नावेद अब्बास (वय ५२) असे असून, जखमी व्यक्ती बिलाल अब्बास झफर आहे. दोघेही मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, ते मालवाहू वाहनाद्वारे मालेगावकडे जात होते.
दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास नऊच्या दरम्यान फैजलापूर टोल नाक्याच्या काही अंतरावर वाहनाचा वेग अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात नावेद अब्बास यांचा जागीच मृत्यू झाला, तर बिलाल अब्बास झफर गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नावेद अब्बास यांना मृत घोषित केले.
जखमी बिलाल अब्बास झफर यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचा पंचनामा मेहकर पोलिसांनी करून प्रकरणाची नोंद घेतली आहे.
अपघातात एकाचा मृत्यू, एकाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष — समृद्धी महामार्गावर वेगाचा बळी!
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ भीषण अपघात — उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment