बुलढाणा प्रतिनिधी ;-
बुलढाणा शहरातील अनंता शिंदे यांनी अलीकडेच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश घेतल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या विरोधात एका महिलेनं अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा आरोप करत बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अनंता शिंदे यांच्या पत्नी योगिता शिंदे यांनी पलटवार करत स्वतःवर झालेल्या मारहाणीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. योगिता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तीन महिलांनी त्यांच्यावर हल्ला करत शिवीगाळ, मारहाण आणि सोन्याची पोथ हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पायल तेजस शिरमाने,
आशा किशोर कोठारी (दोघी रा. जळगाव) आणि
छाया वसंत चवरे (रा. छत्रपती संभाजीनगर)
या तिन्ही महिलांनी संगम चौकातील अनंता शिंदे यांच्या कार्यालयात घुसून योगिता शिंदे यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेदरम्यान त्या महिलांनी “तुमचे पती अनंता शिंदे आम्हाला बोलावले आहे” असे म्हणत वाद घातला. योगिता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्यावर तिन्ही महिला भडकल्या आणि “तू सफाईचे काम कर, जास्त बोलू नकोस” असे म्हणत त्यांना ढकलून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारीनुसार, या हल्ल्यात योगिता शिंदे यांच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोथीचे नुकसान झाले असून, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी पोलिसांनी पायल शिरमाने, आशा कोठारी आणि छाया चवरे यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही तक्रारींची चौकशी सुरू असून, घटनेचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत.
एकाच घटनेवरून दोन्ही बाजूंकडून तक्रारी; राजकीय पार्श्वभूमीमुळे चर्चेला उधाण
बुलढाण्यात अनंता शिंदे यांच्यावर अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा; पत्नी योगिता शिंदे यांचा पलटवार, तीन महिलांविरुद्धही गुन्हा दाखल
0
9
5
5
4
2
Users Today : 44
Leave a comment