बुलढाणा प्रतिनिधी ;-
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आगामी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिले दोन दिवस कोणत्याही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. मात्र, आज तिसऱ्या दिवशी अखेर नगरसेवक पदासाठी पहिला नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे.
हा अर्ज प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून ज्योत्स्ना अशोक नागरे यांनी दाखल केला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आगामी काही दिवसांत नामांकन दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर असून, त्यानंतर छाननी, माघार व अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया होईल.
“पहिला अर्ज दाखल — बुलढाणा नगरपालिकेत निवडणुकीचा ताप वाढला!”
Users Today : 22