बुलढाणा प्रतिनिधी ;-
बुलढाणा जिल्ह्यात सध्या डोळ्यांच्या फ्लूचा (Eye Flu / Conjunctivitis) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता स्वतःची आणि इतरांचीही काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक नागरिकांना डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे आणि चिकट स्त्राव येणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत. पावसाळ्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि अॅलर्जी यांचा धोका वाढत असल्याने अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढते.
वैद्यकीय तज्ञांच्या मते, या आजाराला “कंजंक्टिवाइटिस (Conjunctivitis)” किंवा “पिंक आय (Pink Eye)” असेही म्हणतात. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून, स्पर्श, हवेद्वारे किंवा संक्रमित वस्तूंमुळे इतरांनाही लवकर होऊ शकतो.
मुख्य लक्षणे:
डोळे लालसर होणे
जळजळ, खाज येणे
डोळ्यातून चिकट स्त्राव येणे
डोळे दुखणे किंवा सूज येणे
प्रकाश सहन न होणे
सावधगिरीचे उपाय:
डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
डॉक्टरांचा सल्ला न घेता कुठलेही ड्रॉप किंवा औषध वापरू नका.
डोळ्यांना वारंवार हात लावू नये.
स्तःचे रूमाल, उशी, टॉवेल इतरांसोबत शेअर करू नका.
डोळ्यांचा फ्लू झालेल्या व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे आणि काही दिवस स्वत:ला अलिप्त ठेवावे.
इतरांच्या डोळ्यात ड्रॉप टाकणे टाळावे — यामुळे संसर्ग पसरू शकतो.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हा आजार घरगुती उपायांनी बरा करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण चुकीच्या औषधोपचारामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
“डोळ्यांचे आरोग्य जपा — स्वच्छता, सावधगिरी आणि वैद्यकीय सल्ला हेच संरक्षण!”
बुलढाणा जिल्ह्यात ‘डोळ्यांच्या फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव — नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी!
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment