बुलढाणा प्रतिनिधी ;-
राजधानी दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र राज्यातही हाय अलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दररोज हजारो भाविकांचे आगमन असणाऱ्या विदर्भ पंढरी शेगावमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली असून, मंदिर परिसर आणि शहर परिसरावर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे.
पोलीस ‘अलर्ट मोड’वर
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार शेगाव पोलीस आणि पूरक यंत्रणा पूर्णतः “अलर्ट मोड” वर आहेत.
वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संत गजानन महाराज संस्थान मंदिर परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
भाविकांची काटेकोर तपासणी
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसह संशयास्पद व्यक्तींची प्रवेशद्वारावर सखोल तपासणी केली जात आहे.
भाविकांच्या पिशव्या व सामानाची तपासणी करूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संस्थानची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था देखील सतत दक्ष आहे.
पोलीस यंत्रणेचा तगडा ताफा तैनात
मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक पितांबर जाधव, उपनिरीक्षक संजय पहूरकर, ग.उ.नि. भांदुरगे, सहाय्यक उपनिरीक्षक हुसेन पटेल, गजेंद्र रोहणकार, प्रशांत कुलकर्णी, पोलीस हवालदार गजानन गीते, पोलीस जमादार उद्धव कंकाळे आणि तुकाराम इंगळे यांसह इतर अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसरात सतत गस्त घालत आहेत.
तसेच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी तैनात आहेत.
भाविकांनीही घ्यावी दक्षता
पोलीस प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, सुरक्षा तपासणीत सहकार्य करावे, संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
शेगावमध्ये हाय अलर्ट! दिल्लीतील स्फोटानंतर विदर्भ पंढरीत सुरक्षा व्यवस्था कडक
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment