यारी निवडणुकीची, चाचपणी उमेदवारांची..! चिखलीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन

Khozmaster
2 Min Read

चिखली, बुलढाणा जिल्हा ;-

आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज चिखली येथे शिवसेना पक्षातर्फे नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतींमध्ये मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली आणि बुलढाणा या नगरपरिषद क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. सर्व नगरपरिषदांवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
शहर विकास, संघटनशक्ती आणि नागरिकांचा सहभाग केंद्रस्थानी
या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी आपले आतापर्यंतचे कार्य, समाजातील सहभाग आणि आगामी निवडणुकीसाठीची तयारी सादर केली.
बैठकीत शहराच्या विकास आराखड्यांवर, नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या उपायांवर आणि संघटनेच्या मजबुतीकरणावर सखोल चर्चा झाली.
नागरिकाभिमुख आणि पारदर्शक नेतृत्व पुढे यावे, या हेतूने संवादात्मक पद्धतीने मुलाखती पार पडल्या.
विकासाच्या वचनबद्धतेवर विश्वास
शिवसेनेच्या नेतृत्वाने जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
“मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, बुलढाणा आणि चिखली येथे शिवसेनेच्या कार्यकाळात झालेला विकास पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे,” असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या संघटनशक्ती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाची वचनबद्धता यांच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या बैठकीस आमदार श्री. संजय गायकवाड, माजी आमदार श्री. संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर,
जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, श्री. ओमसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. माया म्हस्के, तसेच
शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *